विनोद- Jokes लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
विनोद- Jokes लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

बुधवार, २३ एप्रिल, २०१४

विनोद- Jokes

जीवशास्त्राचे शिक्षक - जर समजा एखाद्या मुलीला अस्थमाचा attack आला तर तिला खूप वेळ आपल्या ओठांनी श्वास द्या.
झंप्या - ते ठीक आहे..........पण असं काय करायचं की ज्याने मुलीला अस्थमाचा attack येईल.?.........

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

👺रावण : सिगरेट आहे का रे?
कुंभकर्ण : नाही... संपल्या.
बिभिषण : अरे नाही काय म्हणतोस
एक पाकीट
आहे ना अजून!
...
कुंभकर्ण : तु जरा शांत बस ना!
त्या साल्याला दहा तोंडे आहेत....
एका मिनिटात
पाकीट संपवेल...😜😜😜😜

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰



औरंगजेब 😡- सेनापती.... ईतकं
शोधुनही शिवाजी का सापडत
नाहीये ?

सेनापती 😋-  आपण मुघल आहोत ... गुगल नाही !  😆

बुधवार, ११ एप्रिल, २०१२

Jokes collection


Attack
जीवशास्त्राचे शिक्षक - जर समजा एखाद्या मुलीला अस्थमाचा attack आला तर तिला खूप वेळ आपल्या ओठांनी श्वास द्या.
झंप्या - ते ठीक आहे..........पण असं काय करायचं की ज्याने मुलीला अस्थमाचा attack येईल.?........

एक बेवडा रस्त्याने दारू पिवून झिंगत
झिंगत जात असतो…
पोलीस :- काय रे बेवड्या,
इतक्या रात्रीच कुठे फिरतोयस…?
बेवडा :- कुठे नाही, जरा “दारू प्यायचे
दुष्परिणाम” या विषयावर व्याख्यान
ऐकायला जातोय.
पोलीस :- इतक्या रात्री कोण देणार आहे
रे व्याख्यान?
बेवडा :- कोण नाय, माझी बायको..

Puneri
पुण्यात मुबलक प्रमाणात व काहीच कष्ट न करता काय मिळते ???
.
.
.
.
.
अपमान !!!


आशा
गाढव : माझा मालक खूप मारतो
कुत्रा : तर तू पळून जा कि
गाढव: त्याची मुलगी जेव्हा अभ्यास् करत नाही तेव्हा तो म्हणतो अभ्यास कर नाहीतर
तुझ लग्न एखाद्या गाढवा बरोबर लाऊन देईन
बस या एका आशे वर काम करतोय .


बुधवार, ४ एप्रिल, २०१२

सोमवार, १२ सप्टेंबर, २०११

दुभंगून जाता जाता- सुरेश भट


दुभंगून जाता जाता मी अभंग झालो !

चिराचिरा जुळला माझा, आत दंग झालो !

सल जुनेच सलता सलता सुखावून गेले !
अन्‌ हळूच गुणगुणती हे वळ न मोजलेले !
कशी कथा सरता सरता पूर्वरंग झालो !
दुभंगून जाता जाता मी अभंग झालो

किरण एक धरुनी हाती मी पुढे निघालो !
अन्‌ असाच वणवणताना मी मला मिळालो !
सर्व संग सुटले; माझा मीच संग झालो !
दुभंगून जाता जाता मी अभंग झालो

ज्ञानदेव लिहुनी गेले ओळओळ भाळी !
निमित्तास माझे गाणे, निमित्तास टाळी !
तरू काय ? इंद्रायणिचा मी तरंग झालो !
दुभंगून जाता जाता मी अभंग झालो

कुठे दिंड गेली त्यांची कळेना बिचारी !
मी इथेच केली माझी सोसण्यात वारी !
’पांडुरंग’ म्हणता म्हणता ’पांडुरंग’ झालो !
दुभंगून जाता जाता मी अभंग झालो

गुरुवार, २४ फेब्रुवारी, २०११

पु. ल. देशपांडे Joke

 एक मेत्रीण नुकतीच बाजारात जाऊन आली होती व अगदी रंगात येऊन मला सागंत होती, काय सुदंर सुदंर कोल्हापुरी साज आहेत गं इथल्या बाजारात., अप्रतीम नमुने आणि सूदंर कलाकुसर, अनं भरगच्च तर इतके की एक साज घातला गळ्यात की दुसंर काहीच घालायला नको.' हे ऎकत जवळपास असलेले भाई मीश्कीलपणे हळुच म्हणाले, 'खरं सागंतेस की काय?' क्षणभराने त्यातली खोच लक्षात आल्यावर ऎत्रिणीचीं लाजुन व आमची हसुन मुरकुंडी वळली.