मराठी प्रार्थना- Marathi Prarthana लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
मराठी प्रार्थना- Marathi Prarthana लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

बुधवार, ९ मे, २०१२

नव्या वैभवाचीच स्वप्ने सजावी- प्रार्थना - अविनाश धर्माधिकारी

नव्या वैभवाचीच स्वप्ने सजावी
मनी हास्य लेवून मुक्त्ती जगावी 
हवी फक्त्त उन्मुक्त्त निर्माणशक्त्ती
नवी ध्येयं आसक्त्त प्रल्हाद भक्त्ती 

अहंता गळावी अभंगास म्हणता 
तपस्येत तल्लीन  आतून होता
प्रतिभे समस्तीत आकार यावे
उरी उत्तमाचेच ओंकार गावे

जरी एक अश्रू पुसायास आला
तरी जन्म काहीच कामास आला
जरी अश्रू  विस्फोट होऊन सजला 
तरी मुक्त्त ज्वालामुखी जन्म झाला