" वपुर्झा "- व.पु.काळे
'स्त्री’ ला जन्माला घालताना परमेश्वराने तिला विचारलं, 'तुला बुद्धी हवी का सौंदर्य?’ तेंव्हा ती स्त्री म्हणाली, 'बुद्धीची गरज नाही, सौंदर्यच दे! 'का?' 'बुद्धीच्या सामर्थ्यावर सौंदर्य मिळवता येत नाही, पण सौंदर्याच्या जोरावर बुद्धी विकत घेता येते.’
"आपत्ती पण अशी यावी कि तिचा इतरांना हेवा वाटावा....व्यक्तिचा कस लागावा.पडायचंच असेल तर, ठेच लागुन पडू नये, चांगलं २००० फ़ुटांवरुन पडावं..म्हणजे माणूस किती उंचावर पोचला होता हे तरी जगाला समजेल. !"
पशू माणसांपेक्षा जास्त श्रेष्ठ आहेत कारण ते INSTINCT वर जगतात...बेदम वजन वाढलंय म्हणून घारीला उडता येत नाही, किंवा एखादा मासा बुडाला असं कधी ऐकलंय का ?
एकदा केव्हातरी शांतपणे बसावं आणि वयानुसार आपण काय काय गोष्टी सोडल्या ह्याचा आढावा घ्याचा. मग लक्षात येतं, की आपण गाभुळलेली चिंच बरयाच वर्षात खाल्ली नाही, जत्रेत मिळणारी पत्र्याची शिट्टी वाजवलेली नाही. चटक्याच्या बिया घासुन चटके द्यावेत असं आता वाटत नाही, कारण परीस्थितीचे चटके सोसतानाच पुरेवाट झालेली असते. कॅलिडोस्कोप बघितलेला नाही. सर्कशितला जोकर आता आपलं मन रिझवु शकत नाही. तसंच कापसाची म्हातारी पकडण्याचा चार्मही आता राहीलेला नाही. कापसाच्या त्या म्हातारीने उडता उडता आपला "बाळपणीचा काळ सुखाचा " स्वत: बरोबर कधी नेला ते कळलंच नाही. त्या ऊडणारया म्हातारीने सर्व आनंद नेले. त्याच्या बदल्यात तिच वार्धक्य तिने आपल्याला दिलं. म्हणुन ती अजुनही ऊडु शकते. आपण जमिनीवरच आहोत
जाळायला काही नसलं की पेटलेली काडीसुद्धा आपोआप विझते.
खर्च झाल्याचं दु:ख नसतं, हिशोब लागला नाही की त्रास होतो.
प्रॉब्लेम्स नसतात कोणाला? ते शेवटपर्यंत असतात. पण प्रत्येक प्रॉब्लेमला उत्तर हे असतचं. ते सोडवायला कधी वेळ हवा असतो, कधी पैसा तर कधी माणसं या तिन्ही गोष्टीपलिकडचा प्रॉब्लेम अस्तित्वात नसतो.
एकाकीपण वेगळं , एकांत वेगळा . परीसराचं मौन म्हणजे एकांत .आणि परिवारात असतानाही पोरकं वाटण हे एकाकीपण .एकाकी वाटलं तर मनसोक्त रडावं.
अश्रु म्हणजे दुबळेपणा नाही. पावसाळी ढग जसे बरसल्यावर हलके होतात. आणि दिसेनासे होतात, तसा माणुसही हलका होतो. आकाशाजवळ पोहोचतो. असंच कोणतं तरी दुःख पार केल्यावर तुकाराम " तुका आकाशायेवढा " असं लिहुन गेला असेल.
आकाशात जेव्हा ऊपग्रह सोडतात तेव्हा गुरुत्वाकर्षणाच्या बाहेर पिटाळुन लावे पर्यंत संघर्ष असतो, त्याने गती घेतली की उरलेला प्रवास आपोआपच होतो . असच माणसाचं आहे.......समाजात एक विशिष्ट ऊंची गाठे प्रर्यंत सगळा संघर्ष असतो. पण एकदा अपेक्षित ऊंचीवर पोहोचलात की आयुष्यातल्या अनेक समस्या ती ऊंचीच सोड्वते.
सर्वात जिवघेणा क्षण कोणता? खूप सद्भावनेनं एखादी गोष्ट करायला जावं आणि स्वतःचा काहीही अपराध नसताना पदरी फक्त वाईटपणा यावा, सद-हेतूंचीच शंका घेतली जावी, हा!
पावसातून भटकताना अंगावरचा शर्ट भिजतो , तेंव्हा काही वाटत नाही. तो अंगावरच हळू हळू सुकतो त्याचंही काही वाटत नाही.सुकला नाही तरी ओल्याची सवय होते.पण म्हणून कोणी ओलाच शर्ट घाल म्हटले तर.....
प्रश्नांपासून नेहमीच पळता येत नाही,कधी ना कधी ते पळणार्याला गाठतातच,पळवाटा मुक्कामाला पोहचवत नाहीत, मुक्कामाला पोहचवतात ते सरळ रस्तेच...
निर्णय चुकीचा आहे की बरोबर हे काळावर मोजायचं की बुध्दीवर ?बुध्दीच नसेल तर ३ तास दिले तरी पेपर कसा सोडवणार ?
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा