रविवार, २४ ऑक्टोबर, २०१०

Inspirational forever - प्रेरणादायी - Collection

नशिबानं तुला दिली
नाही साथ
म्हणून का सोडतोस
जीवनाची वाट
नशिबानंच केला
तुझा घात
मग का बसलास असा
ठेवून हातावर हात
उठ आणि कर नशिबावर
आताच मात
नाशिबाच्याही पुढ जाण्याची
बांध मनाशी खुणगाठ
तरच सुखी होशील तू
खडतर आयुष्यात. -Unknown.


नात्यास नाव अपुल्या देऊ नकोस काही
साऱ्याच चांदण्यांची जगतास जाण नाही
गावातल्या दिव्यांना पथ तो कसा पुसावा
मंजिल की जयांची तारांगणात राही- कवी कुसुमाग्रज

आधार दुखीतांचे होतात हात ज्यांचे
सेवेत धर्म आहे, सेवेत तीर्थ ज्यांचे
सहवास ईस्वराचा त्याला वनात नाही
हृदयात देव आहे कोणी अनाथ नाही. -मंगेश पाडगावकर

एका मुलीने डॉक्टर ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्यावर लिहिलेल्या इंग्रजी कवितेच मराठीतील रुपांतरण- जे काही वर्ष्यापुर्वी लोकमतच्या मैत्र या पुरवणीमध्ये आल होतं....

कोण आहेस तू?
त्याच्या अस्तित्वाच्या
पहिल्याच दिवशी
सूर्यानं त्याला प्रश्न विचारला
त्यान काहीच उत्तर दिल नाही
आपल्या नियोजित मार्गावर
अतीव आत्मविश्वासानं
तो चालत राहीला
त्याच्या अस्तित्वाच्या
अखेरच्या दिवशी
सूर्यानं तोच प्रश्न
त्याला पुन्हा विचारला
ठाम विश्वासानं तो उत्तरला
मी स्वयंप्रकाशित आहे...
स्वयंभू आहे...
तुझ्याचसारखा!
सूर्यानं आपली सारी शस्त्रे खाली ठेवली
आणि तो त्याला शरण गेला
मानवानं केलेला हा त्याचा
आणखी एक पराभव होता...

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: