बुधवार, २० ऑगस्ट, २०१४

टोकियो सफर - राहुल

जपानमध्ये वर्षभरात मिळणाऱ्या सरकारी सुट्ट्या तशा फार कमी (भारताच्या तुलनेत) असतात. आपल्याकडे जसा पितृ-पंधरवडा असतो, तसच काहीसं "ओबोन ओमात्सुरी" नावाने साजरा करतात. स्वतच्या पूर्वजांच्या गावी जाऊन त्यांची पूजा केली जाते.



याच सुट्टीच निमित्त साधून मागच्या आठवड्यात टोकियोला फिरायला गेलो होतो. जपानमध्ये येवून आता ५ वं वर्ष चालू आहे, पण टोकियो पाहण्याचा योग अगोदर कधी आला नव्हता. मित्रांसोबत फिरताना खूप साऱ्या नवीन गोष्टी पाहायला मिळाल्या. स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी भारतीय दुतावासात झेंडा-वंदनाच्या कार्यक्रमाला गेलो होतो. योगायोग असा की त्याच दिवशी यासुकुनी श्राईन (जे भारतीय दुतावासाच्या अगदी जवळ आहे) परिसरात खूप गर्दी होती. नंतर लक्षात आलं की- याच दिवशी जपानने दुसऱ्या महायुद्धात बिनशर्त शरणागती पत्करली होती !! जपानमध्ये भारतीय लोकांची कमी नाही पण बहुतांश लोकं टोकियो-परिसरात राहतात. सांस्कृतिक कार्यक्रम पाहताना गावी शाळेत असताना केलेल्या गोष्टींची खूप आठवण आली.  


जपानमध्ये फिरताना जागोजागी आपल्याला एक विशिष्ट प्रकारची मूर्ती पाहायला मिळते. त्यामागची कथा मात्र टोकियोमध्ये फिरताना पूर्णतः समजली (http://en.wikipedia.org/wiki/Jiz%C5%8D). या मूर्त्यांना बौद्ध धर्मात क्षितीगर्भ (म्हणजेच बोधिसत्व) आणि जपानमध्ये ओ-जीझो-सामा या नावाने संबोधल जाते. अनाकलनीय भीती आणि शंकांवर मात करण्यासाठी आधाराच्या शोधात जगाच्या पाठीवर सगळेच असतात! 


जगात सतत धावणाऱ्या शहरांपैकी एक असलेले टोकियो शहर सार्वजनिक सुट्ट्या असूनही सुट्टीवर नव्हत!!

-
राहुल 


शनिवार, २८ जून, २०१४

दमलेल्या बाबाची कहाणी

कोमेजून निजलेली एक परीराणी
उतरलेले तोंड, डोळा सुकलेले पाणी
रोजचेच आहे सारे काही आज नाही
माफी कशी मागू पोरी मला तोंड नाही
झोपेतच घेतो तुला आज मी कुशीत
निजेतच तरी पण येशील खुशीत
सांगायाची आहे माझ्या सानुल्या फुला
दमलेल्या बाबाची ही कहाणी तुला !

आटपाट नगरात गर्दी होती भारी
घामाघूम राजा करी लोकलची वारी
रोज सकाळीस राजा निघताना बोले
गोष्ट सांगायचे काल राहुनिया गेले
जमलेच नाही काल येणे मला जरी
आज परी येणार मी वेळेतच घरी
स्वप्नातल्या गावामध्ये मारू मग फेरी
खऱ्याखुऱ्या परी साठी गोष्टीतली परी
बांधीन मी थकलेल्या हातांचा झुला
दमलेल्या बाबाची ही कहाणी तुला !

ऑफिसात उशिरा मी असतो बसून
भंडावले डोके गेले कामात बुडून
तास-तास जातो खाल मानेने निघून
एक-एक दिवा जातो हळूच विझून
अशा वेळी काय सांगू काय काय वाटे
आठवांसोबत पाणी डोळ्यांतून दाटे
वाटते की उठुनिया तुझ्या पास यावे
तुझ्यासाठी मीही पुन्हा लहानगे व्हावे
उगाचच रुसावे नी भांडावे तुझ्याशी
चिमुकले खेळ काही मांडावे तुझ्याशी

उधळत, खिदळत, बोलशील काही
बघताना भान मला उरणार नाही
हासुनिया उगाचच ओरडेल काही
दुरूनच आपल्याला बघणारी आई
तरी सुद्धा दोघे जण दंगा मांडू असा
क्षणा क्षणावर ठेवू खोडकर ठसा
सांगायची आहे माझ्या सानुल्या फुला
दमलेल्या बाबाची ही कहाणी तुला !

दमल्या पायाने जेव्हा येईल जांभई
मऊ मऊ दूध-भात भरवेल आई
गोष्ट ऐकायला मग येशील ना अशी
सावरीच्या उशीहून मऊ माझी कुशी

कुशी माझी सांगत आहे ऐक बाळा काही
सदोदित जरी का मी तुझ्या पास नाही
जेवू-खाऊ न्हाऊ-माखू घालतो ना तुला
आई परी वेणीफणी करतो ना तुला
तुझ्यासाठी आईपरी बाबा सुद्धा खुळा
तो ही कधी गुपचूप रडतो रे बाळा
सांगायची आहे माझ्या सानुल्या फुला
दमलेल्या बाबाची या कहाणी तुला !

बोळक्यामध्ये लुकलुकलेला तुझा पहिला दात
आणि पहिल्यांदाच घेतलास जेव्हा तोंडी मऊ भात
आई म्हणण्याआधी सुद्धा म्हणली होतीस बाबा
रांगत रांगत घेतलास जेव्हा घराचा तू ताबा
लुटूलुटू उभं राहत टाकलंस पाऊल पहिलं
दूरचं पहात राहिलो फक्त, जवळ पहायचंच राहिलं

असा गेलो आहे बाळा पुरा अडकून
हल्ली तुला झोपेतच पाहतो दुरून
असा कसा बाबा देव लेकराला देतो
लवकर जातो आणि उशिरानं येतो
बालपण गेले तुझे गुज निसटून
उरे काय तुझ्या-माझ्या ओंजळी मधून
जरी येते ओठी तुझ्या माझ्यासाठी हसे
नजरेत तुझ्या काही अनोळखी दिसे
तुझ्या जगातून बाबा हरवेल का ग ?
मोठेपणी बाबा तुला आठवेल का ग ?
सासुराला जाता-जाता उंबरठ्यामध्ये

बाबासाठी येईल का पाणी डोळ्यांमध्ये ?

गीतकार : संदीप खरे, गायक : संदीप खरे - सलील कुळकर्णी, संगीतकार : सलील कुळकर्णी

बुधवार, २८ मे, २०१४

इतनी शक्ति हमें देना दाता- प्रार्थना

इतनी शक्ति हमें देना दाता, मन का विष्वास कमज़ोर हो ना (२)
हम चलें नेक रस्ते पे हम से, भूल कर भी कोई भूल हो ना
इतनी शक्ति हमें देना दाता, मन का विष्वास कमज़ोर हो ना
हम चलें नेक रस्ते पे हम से, भूल कर भी कोई भूल हो ना
इतनी शक्ति हमें देना दाता, मन का विष्वास कमज़ोर हो ना

दूर अज्ञान के हों अँधेरे, तू हमें ज्ञान की रोशनी दे
हर बुराई से बचते रहें हम, जितनी भी दे भली जिंदगी दे
बैर हो ना किसी का किसी से, भावना मन में बदले की हो ना
हम चलें नेक रस्ते पे हम से, भूल कर भी कोई भूल हो ना
इतनी शक्ति हमें देना दाता, मन का विष्वास कमज़ोर हो ना

हम ना सोचें हमें क्या मिला है, हम ये सोचें किया क्या है अर्पण
फूल खुशियों के बांटे सभी को, सब का जीवन ही बन जाये मधुबन
अपनी करूणा का जस तू बहा के, कर दे पावन हर एक मन का कोना
हम चलें नेक रस्ते पे हम से, भूल कर भी कोई भूल हो ना
इतनी शक्ति हमें देना दाता, मन का विष्वास कमज़ोर हो ना..


Movie : Ankush (1986)
Singers : Pushpa pagdhare and Sushma Shreshtha,
Lyricist : Abhilash

शुक्रवार, २३ मे, २०१४

शेरो-शायरी- संग्रहीत

तेरी पहचान भी न खो जाए कहीं |
इतने चेहरे ना बदल, थोड़ी सी शोहरत के लिए ||



फुरसत में करेंगें तुझसे हिसाब - ए - जिंदगी |

अभी उलझे है हम, खुद को ही सुलझाने में ||



कटी पतंग का रूख था, मेरे घर की तरफ.....

मगर उसे भी लूट ले गये, ऊँचे मकान वाले.....



हादसों से तुम अगर घबराओगे,

एक दिन खुद हादसा बन जाओगे...
जानते हो पत्थरो का शहर है, फिर 
किस गली से आईने ले जाओगे...
समझते रहते हो सबको अपना मगर ,
अपनी तन्हाई कहा ले जाओगे...



बहुत दूर है मेरे शहर से तेरे शहर का किनारा;

फिर भी हम हवा के हर झोंके से तेरा हाल पूछते है।



चढ़ जाए तो फिर उतरता ही नहीं कमबख्त |

यह इश्क भी गरीब के क़र्ज़ जैसा है ||



हर वक़्त जिंदगी से गिले शिकवे ठीक नहीं...

कभी तो छोड़ दो कश्ती इन मौजो के सहारे...



तेरी नेकी का लिबास ही 

तेरा बदन ढकेगा ऐ बंदे...
सुना है ऊपर वाले के घर 
कपड़ों की दुकान नहीं होती...



हर बात पे रंजिश, हर बात पे "हिसाब" जैसे 

हमने "इश्क" नहीं, "नौकरी" कर ली हो तेरी ||



कहने को तो "हमदर्दों" की कमी नही है |

और हर "दर्द" इन हमदर्दों की "हमदर्दी" है ||




चंद सिक्को में बिकता है यहाँ ईमान लोगो का | 

कौन कहता है मेरे देश मे महँगाई बहुत है ||



मोहब्बत आजमानी हो, तो बस इतना ही काफी है |

जरा सा रूठ कर देखो, मनाने कौन आता है ||




वक़्त भी लेता है करवटें न जाने क्या क्या ।

उम्र इतनी तो नहीं थी जितने सबक सीख लिए हमने...।।



मस्जिद तो हुई हासिल हमको,

खाली ईमान गंवा बैठे ।
मंदिर को बचाया लढ-भीडकर,
खाली भगवान गंवा बैठे ।
धरती को हमने नाप लिया,
हम चांद सितारों तक पहुंचे ।

कुल कायनात को जीत लिया,
खाली इन्सान गंवा बैठे ।
मजहब के ठेकेदारों ने आज फिर हमे युं भडकाया ।
के काजी और पंडित जिन्दा थे,
हम अपनी जान गंवा बैठे ।




मै न बदला, मगर जमाना बदल गया ।
जानी गलियों में , मकान पुराना बदल गया...।।




बुलंदियों की ख्वाइशें तो बहुत है मगर...
दूसरों को रौंदने का हुनर कहाँ से लायें ||





Most of the above copied from Facebook Friend 

बुधवार, २१ मे, २०१४

सुविचार (Quotes)



















Source- http://www.entrepreneur.com/

गुरुवार, १ मे, २०१४

अर्धवट स्वप्नांचा प्रवास

स्वतःच्याच व्यक्तिमत्वाचे अनेक पैलू कळायला योग्य वेळ यावी लागते, अन अशी वेळ जेव्हा येते ना, त्यावेळी कधी-कधी विश्वासच बसत नाही. आपण असेही वागू शकतो-हे पचनी पडायला वेळ द्यावा लागतो. अशा अचानक घडणाऱ्या गोष्टींमुळे आपल्यात अनेक बदल होत असतात.

हरवलेल्या अन पुन्हा कधीही न सापडणाऱ्या काही स्वप्नांना आणि नात्यांना मन सतत आठवत असतं. माहित असतं कि आता काहीही परतून येणार नाहीये. या व्यवहारी आणि मायावी जगात देव (पावित्र्य) आणि देवत्व सांभाळण जितकं कठीण आहे, त्याहून अशा आठवणीतल्या नात्यांना (मन हलकं कराव म्हणून) उजाळा देताना योग्य व्यक्ती भेटणं महाकठीण आहे. देवतुल्य गुरुजन, जीवाला जीव देणारे मित्र-मैत्रिणी, गावाकडे शाळेत असताना आजी-आजोबांचा जिव्हाळा....... 
ह्या आठवणी जीवन जगताना खूप प्रेरणा देतात. मनाला एक अकल्पित शक्ती आणि स्फूर्ती देत असतात. काही अपूर्ण राहिलेली स्वप्नं काही काळ मनाला छळणारचं!!! पण म्हणतातना- काळ हा सगळ्या जखमांवरील जालिम उपाय आहे. जसा-जसा काळ पुढे सरकतो, तसं अर्धवट छळणाऱ्या सुरवंठरूपी स्वनांचं बळ देणाऱ्या (विविध रंगाच्या छटा असणाऱ्या) फुलपाखरांरूपी आठवणींमध्ये रुपांतर होत असतं!! अर्धवट स्वप्नांचा असा होणारा प्रवास निश्चितच फार सुखकर असा नसतो...पण तो तसाच व्हायला हवा. वि. स. खांडेकरांच्या "अमृतवेल" कादंबरीतील तो परिच्छेद हाच समर्पक उपदेश देणारा आहे.
-
राहुल



बुधवार, २३ एप्रिल, २०१४

निवडक व.पु.

एकाकीपण वेगळं, एकांत वेगळा, एकांताची माझी व्याख्या फार वेगळी आहे. परिसराचं मौन म्हणजे एकांत आणि परिवारात असतानाही निराधार वाटणं हे एकाकीपण. तेव्हा तू एकांतात जा, मनसोक्त रड. जमिनीला अश्रू हवे असतात. मातीचं देणं चुकवलं की हलकी होशील. वर चढशील, आकाशाजवळ पोहोचशील. असचं कोणतं तरी दुःख पार केल्यावर तुकाराम, ’तुका आकशाएवढाअसं लिहून गेला असेल.’

तू भ्रमत आहासी वाया................

रडणं म्हणजे दुबळेपणाचं लक्षण नव्हे. मोकळेपणी रडायला धैर्य लागतं.’

ये, पण नुसती पडून रहा. माझ्याजवळ येऊन रडायला लागलीस की मी सांत्वनासाठी शब्द शोधणार. सांत्वनासाठी आजवर जगात कुणालाही शब्द सापडले नसतील. सांत्वन म्हणजे दुःखाच मूल. मूल आईपेक्षा मोठं कसं होईल? मूल मोठं व्हायला लागलं की आई आणखी मोठी व्हायला लागते. म्हणून,समजूत घालणारं कुणी भेटलं म्हणजे हुंदके वाढतात. हसता हसता माणूस एका क्षणात थांबू शकतो. दुःखातली व्यक्ती रडणं एका क्षणात विसरू शकत नाही. तेव्हा तू जा. बाहेर पड. एकांत शोध. तिथं तू तुझी डिग्री विसरशील. समजुतीला कुणी येणार नाही. शांत होण्याचे इशारे आतूनच उमटतील, मग आपोआप शांत होशील.’


"प्रियकर परिपूर्ण असतो. नवर्याला मर्यादा असतात" कारणसंसार हा व्यवहार आहे. प्रियकराच्या बाबतीत संपूर्ण समर्पण असतं. मीउरत नाही. म्हणून संघर्ष नसतो. संसारात तसं होत नाही.’

प्रेम म्हणजे मरण असतं. मीहा शब्द प्रेमात आणि भक्तीत उरत नाही. मरणात तेच होतं. ज्याला जिवंतपणी मरण अनुभवायचं आहे, तोच खरं प्रेम करु शकतो.’

सुर्यप्रकाश वाढू लागला की दंवबिंदू आपोआप नाहीसे होतात.’

‘अंधाऱ्या वाटेवर क्षणभर विजेचा प्रकाश पडतो. वीज चमकून नाहीशी झाली की अंधार जास्त गडद होतो. मग काही काळ चालणं अवघड जातं. म्हणून सांगतो. गुरू शोधू नकोस. चालणं, ठेचकाळणं, रक्तबंबाळ होणं, एकाकी पडणं, दरीत कोसळणं, हे सगळ घडू दे. नियती, प्रारब्ध हे अड्थळे मानू नकोस. ते सौभाग्य आहे. आगीतून जा. कचरा जळून जाईल. सोनं उरेल. प्रेमपुर्तीत साफ़ल्याची शंका असते, प्रेमभंगातलं वैफ़ल्य नवी पायवाट शोधायला लावते, स्वतःच्या मालकीची.

अनुभव घेणारा प्रत्येकजण वेगळा असतो.

आयुष्याच्या प्रवासात एकाची तत्वं दुसर्याला थेअरी वाटते.’

कबुतराला गरूडाचे पंख लावता येत नाहीत. कदाचित लावता येतीलही, पण गगनभरारीचं वेड रक्तातच असावं लागतं. आकाशाची ओढही दत्तक घेता येत नाही.’

रडणं भोगायचं असतं. हसणं उपभोगायचं असतं. ह्याच कारणासाठी आनंदाला परिवार हवा, सगेसोयरे हवेत. आनंदाला सहल हवी,दुःखाला घर हवं. कारणही हवं.’

व्यवहाराला गंध नसतो. स्पर्श नसतो. सूर नसतो. गोंगाट असतो. रूचीच नसते मग अभिरूचीची बातच दूर.’

प्लास्टीक़च्या फ़ुलांना फक्त धुळीचा शाप. सर्फनं धुतली की झालं. पण नळाखाली धरल्यावर ती शहारून येत नाहीत. जन्म-मरणाचाच फ़ेरा नसेल, तर शहारे-रोमांच, आसक्ती, विरह-मिलन, भय, सगळ्यातूनच मुक्ती. जिवंत फ़ुलं स्वाभिमानी असतात. धुळीचा थर जमण्याआधीच मरण पत्करतात.
निर्माल्य म्हणजे हौतात्म्य.
धुळिचा पेहराव म्हणजे अमरता.’

लेखक : .पु. काळे
  —