नव्या वैभवाचीच स्वप्ने सजावी
मनी हास्य लेवून मुक्त्ती जगावी
हवी फक्त्त उन्मुक्त्त निर्माणशक्त्ती
नवी ध्येयं आसक्त्त प्रल्हाद भक्त्ती
अहंता गळावी अभंगास म्हणता
तपस्येत तल्लीन आतून होता
प्रतिभे समस्तीत आकार यावे
उरी उत्तमाचेच ओंकार गावे
जरी एक अश्रू पुसायास आला
तरी जन्म काहीच कामास आला
जरी अश्रू विस्फोट होऊन सजला
तरी मुक्त्त ज्वालामुखी जन्म झाला
२ टिप्पण्या:
plz mention the poet/au
धन्यवाद सुरज. शीर्षकात नाव add केल आहे.
टिप्पणी पोस्ट करा