रविवार, २६ फेब्रुवारी, २०१२

आधार - read on facebook

“एकदा तेथे एका माणसाने आपल्या घराचे नुतनीकरण करायला सुरवात केली 
असे करतांना भिंत तोडून उघडावी लागते कारण 
जपानी घरांच्या भिंती लाकडाच्या असतात 
ही भिंत तोडतांना त्या माणसाच्या असे लक्षात आलं की आतमध्ये एक पाल अडकून पडली आहे आणि भिंत साधतांना मारलेल्या एका खिळ्यात तिचा एक पाय चिणला गेला आहे
त्या पालीची अवस्था पाहून त्याला खूप दया आली
आणि त्याचं कुतूहल जागृत झालं, की हा खिळा जवळपास ५ वर्षांपूर्वी हे घर नवीन बांधल तेव्हा ठोकला गेला होता
मग ५ वर्ष पाय चिणलेल्या अवस्थेत ही पाल जिवंत कशी काय राहिली असेल...???
असं काय घडलं होत की त्या अंधार असलेल्या पोकळीत हालचाल न करता ती पाल जिवंत कधी राहिली...??
जे जवळ जवळ अशक्य होतं..!!!
त्यान त्याचं काम अक्षरशः थांबलावलंच आणि तो त्या पालीवर लक्ष ठेवून बसला,
की ती आता कशी काय खाते..???
काही वेळाने पाहता पाहता त्याच्या लक्षात आलं की
तेथे दुसरी पालही आली आहे आणि तिच्या तोंडात अन्न आहे आणि ती हळू हळू त्या खिळलेल्या पालीला ते अन्न भरवत आहे हे पाहून तो माणूस अवाक झाला,गहिवरला
कल्पना करा १ नाही, २ नाही, तर ५ वर्ष न कंटाळता एक पाल आपल्या जोडीदाराची अशी सेवा करते, अजिबात आशा सोडून न देता..!!!

एका पालीसारखा प्राणी आपल्या प्रिय जोडीदाराला सोडून न जाता त्याची
अशा प्रकारे काळजी घेतो,
आपण माणसं यांपासून काही तरी नक्कीच शिकू शकतो

तेव्हा अडचणीत असलेल्या आपल्या जवळच्या प्रिय व्यक्तीला नेहमी आधार द्या...!!!
“जेव्हा तिला तुमची खरोखरच गरज असते तेव्हा म्हणजे “”तुम्ही”” त्या व्यक्तीसाठी संपूर्ण दुनिया असू शकता कोणतीही गोष्ट ,नातं विश्वास तुटण्यासाठी एक क्षणाचं दुर्लक्ष पुरेसं असतं (परंतु जोडण्यासाठी अख्खं आयुष्य पणाला लावावं लागतं)

बुधवार, २२ फेब्रुवारी, २०१२

सुविचार collection

Half of life is luck; the other half is discipline - and that's the important half, for without discipline you wouldn't know what to do with luck- Carl Zuckmeyer

Humans are really funny animals! Even though they have so many special gifts from nature, they still behave like animals!!

Human progress is neither automatic nor inevitable... Every step toward the goal of justice requires sacrifice, suffering, and struggle; the tireless exertions and passionate concern of dedicated individuals. -Martin Luther King, Jr.



All that is valuable in human society depends upon the opportunity for development accorded the individual. -Albert Einstein

Do not do to others what angers you if done to you by others.

Remember that there is nothing stable in human affairs; therefore avoid undue elation in prosperity, or undue depression in adversity.

Remember what is unbecoming to do is also unbecoming to speak of.

The only good is knowledge and the only evil is ignorance.

The shortest and surest way to live with honour in the world, is to be in reality what we would appear to be; and if we observe, we shall find, that all human virtues increase and strengthen themselves by the practice of them.


Having the fewest wants, I am nearest to the gods.

And in knowing that you know nothing, that makes you the smartest of all.

खुलासे - सुरेश भट

मी खुलासेही कशासाठी करावे?
लोक पाठीमागून घेतात चावे!

ही सुखाच्या इंद्रजालाचीच जादू
पिंज-याला मानिती आकाश रावे!

या फुलांना सारखा दुर्गंध येई...
हे वसंताचे गटारी बारकावे!

धाकटे दुर्वास का निवृत्त झाले?
शापितांनी काय छाट्याचे करावे?

या पिशाच्च्यांच्या कशा आबाद वस्त्या?
माणसांची ही कशी ओसाड गावे?

सांगतो जल्लाद रक्ताचा घरोबा
( सांडलेले रक्त का होते परावे? )

कोणते नाहीत डोळे आज ओले?
आसवांनी आसवांना काय द्यावे?

पाहुनी घ्यावे भविष्याच्या दिठीने...
बोलण्यासाठी जगाचे ओठ व्हावे!

काय साधी माणसे बोलून गेली?
घेतले सिंहासनाने हेलकावे!

जन्मले घेऊन जे पायात काटा
त्या भणंगांनीच यात्रेला निघावे

देश हा बेईमान झालेल्या ऋतूंचा
येथले आषाढ सुद्धा आगलावे!

-सुरेश भट

रविवार, ५ फेब्रुवारी, २०१२

निर्धार - श्री. कविवर्य कुसुमाग्रज


समरभूमिचे सनदी मालक शतयुद्धांचे मानकरी
रणफंदीची जात आमुची कोण आम्हा भयभीत करी ? ||ध्रु.||

घोरपडीला दोर लावुनी पहाड़ दुर्घट चढलेले,
तुटून पङता मस्तक खाली धुंद धडाने लढलेले,
खंदकांतल्या अंगारावर हासत खेळत पडलेले,
बाप असे कळिकाळ आमुचा कीर्त गाजली दिगंतरी,
रणफंदीची जात आमुची कोण आम्हा भयभीत करी ? ||१||

या मातीने दिला वारसा कठोर छाती दगडाची,
दिली नद्यांनी ध्येयासाठी समर्थता बलिदानाची,
पहाड़ डोंगर इथे सांगती अजिंक्यता अभिमानाची,
जगदंबेचा पालव येथे लढवय्यांच्या सदा शिरी,
रणफंदीची जात आमुची कोण आम्हा भयभीत करी ? ||२||

करवत कानस कुणी चालतो पिकवो कोणी शेतमळा,
कलम कागदावरी राबवो धरो कुणी हातात तुळा,
करात कंकण असो कुणाच्या वा भाळावर गंधतिळा,
शिंग मनोय्रावरी वाजता उभी छावणी घरोघरी,
रणफंदीची जात आमुची कोण आम्हा भयभीत करी ? ||३||

पोलादी निर्धार आमुचा असुर बळाची खंत नसे,
स्वतंत्रतेच्या संग्रामाला विजयावाचुन अंत नसे,
श्रद्धा ह्रदयातील आमुची वज्राहुनी बलवंत असे,
मरण मारुनी पुढे निघाले गर्व तयांचा कोण हरी ?
रणफंदीची जात आमुची कोण आम्हा भयभीत करी ? ||४||

भरतभुमिचा वत्सल पालक देवमुनींचा पर्वत तो,
रक्त दाबुनी उरांत आम्हा आर्त स्वराने पुकारतो,
हे सह्याचल, हे सातपुडा, शब्द अंतरा विदारतो,
त्या रक्ताची, त्या शब्दाची शपथ आमुच्या जळे उरी,
रणफंदीची जात आमुची कोण आम्हा भयभीत करी ? ||५||

जंगल जाळपरी मराठा पर्वतश्रेष्ठा उठला रे,
वणव्याच्या अडदांड गतीला अडसर आता कुठला रे ?
तळातळतुनि ठेचुनी काढू हा गनिमांचा घाला रे,
स्वतंत्रतेचे निशान भगवे अजिंक्य राखू धरेवरी,
रणफंदीची जात आमुची कोण आम्हा भयभीत करी ? ||६||