गुरुवार, ३० डिसेंबर, २०१०

नववर्षाचा संदेश...

नविन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा....!!!!
जसे गढूळपणाला हमखनिवळावे लागते
तसे उगवत्यालाही हमखास मावळावे लागते.
जुने जेंव्हा खंगत असते तेंव्हा नवे कुणी रांगत असते
नवे वर्ष आपल्याला हेच तर सांगत असते....
वर्ष,महिने,दिवस आपण असे टप्पे पाडतो
तास,मिनिट,सेकंदासारखे सोईनुसार कप्पे पाडतो
काळाचे खेळी तेंव्हा अनंतात रंगत असते
नववर्ष आपल्याला हेच सांगत असते....

आशेला लागुनच निराशाही येत असते
आपल्या स्वैर स्वप्नांनाही अचूक दिशा देत असते
एकाचे यशस्वी होईल तेंव्हा दुसर्याचे भंगत असते
नवे वर्ष आपल्याला हेच तर सांगत असते.....
नवा नसतो सूर्य,प्रकाशही नवा नसतो,
क्यालेन्डरच्या फ़ड्फ़डाटाने आपल्याला तो नवा भासतो
कुणी करतो संकल्प,कुणी नशेत झिंगत असते
नवे वर्ष आपल्याला हेच तर सांगत असते......

गेलेली संधीही पुन्हा परत आणता येते
आत्मविश्वासाच्या बळावर भविष्य़ही जाणता येते
उगीच वर्तमानाला विसरून कुणी भूतकाळात रंगत असते
नवे वर्ष आपल्याला हेच सांगत असते....
त्रुटी कमी करून ,चुका मात्र टाळल्या पाहिजेत
तुमचा जयघोष ऎकुण लोकांना दिशा कळल्या पाहिजेत
कस्तुरीची किर्ती कशी नकळत पांगत असते
नव वर्ष आपल्याला हेच तर सांगत असते......

नव्याला सामोरे जाताना जुन्याला थारा नको
पूर्वेच्या स्वागताला पश्चिमेचा वारा नको
आपला गंध आपल्याला कळावा
जशी गाय वासराला हूंगत असते
नवे वर्ष आपल्याला हेच सांगत असते.....

कोणताच माणूस कधी आनंदासाठी भांडत नाही
त्याच्याशिवाय मनातला कचरा बाहेर कधी सांडत नाही
मोकळ्या मनाने भांडले की,शत्रुत्व भंगत असते...
नवे वर आपल्याला हेच तर सांगत असते......
धावपळ पाठिशी असली तरी,
आनंदाचे गाणे गायले पाहिजे
डोळेही तेच बघतात त्याला जशी संगत असते
नवे वर्ष आपल्याला हेच तर सांगत असते......


वर्षांमागे वर्षॆ अशीच तर सरून जातात
एका वर्षाने माणसं पुन्हा नव्याने तरूण होतात
ते कसले तरूण?
ज्यांच्यात म्हातारपण रांगत असते
नवे वर्ष आपल्याला
हेच तर सांगत असते !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)

शनिवार, ४ डिसेंबर, २०१०

Quotes from Great personalities

Only two things are infinite, the universe and human stupidity, and I'm not sure about the former.- Albert Einstein
The greatest pleasure in life is doing what people say you cannot do.-Walter Bagehot






You must be the change you want to see in the world-M.Gandhi

You may never know what results come of your action, but if you do nothing there will be no result.-M.Gandhi

To believe in something, and not to live it, is dishonest.-M. Gandhi

"My mother drew a distinction between achievement and success. She said that achievement is the knowledge that you have studied and worked hard and done the best that is in you. Success is being praised by others. That is nice but not as important or satisfying. Always aim for achievement and forget about success - Helen Hayes



"How far you go in life depends on your being tender with the young, compassionate with the aged, sypathethic with the striving, and tolerant of the weak and the strong. Because someday in life you will have been all of those." --- George Washington Carver



"The mountain remains unmoved at seeming defeat by the mist." --- Rabindranath Tagore



"Deal with the faults of others as gently as with your own."

It is better to be hated for what you are, than to be loved for what you are not.- unknown.
Never think there is anything impossible for the soul. It is the greatest heresy to think so. If there is sin, this is the only sin; to say that you are weak, or others are weak.-Swami Vivekananda
Thinking should become your capital asset, no matter whatever ups and downs you come across in your life.-APJ Abdul Kalam
Human flight is nothing but creativity of human mind and it undergoes several struggles to achieve excellence. “Those who cannot work with their hearts achieve but a hollow, half-hearted success that breeds bitterness all around.”-APJ Abdul Kalam

“Climbing to the top demands strength, whether it is to the top of Mount Everest or to the top of your career.”
 “To succeed in your mission, you must have single-minded devotion to your goal.”-APJ Abdul Kalam